जिल्हा परिषद शाळेमधून सेमी इंग्रजी  शिक्षण चालू करण्याची मागणी-  डॉ जितेंद्र कानडे

अणदुर,दि.२१:

धाराशिव जिल्यातील  सर्व जिल्हा परिषद शाळेमधून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण चालू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ जितेंद्र कानडे यांनी निवेदनाद्वारे जि.प.अध्यक्षा यांच्याकडे केली आहे.


निवेदनात पुढे नमुद केले आहे की,जिल्यातील सर्व जि.प शाळामधून इयत्ता १ ते ५ वी पर्यंतच्या वर्गाना सक्तीचे सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळण्यासंदर्भातील निर्णयाला विशेष सर्व साधारण सभेतून मान्यता घेवून प्रस्ताव कार्यान्वित करणे संदर्भात दि २२/०४/२०२६ रोजी विशेष सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वप्रथम सर्व शाळामधून सेमी माध्यम शिक्षण मिळण्याच्या आपल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे.परंतु यापूर्वी देखील असा निर्णय शिक्षण विषय समिती जि.प धाराशिव यांनी सेमी इंग्रजी संदर्भात दि ०६/०६/२०१२ रोजी ठराव पारित केला होता.
 तद्नंतर दि १३/०१/२०२२ रोजी  जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,शिक्षणअधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये कांही प्रमुख निष्कर्षाचा उल्लेख करून जिल्ह्यातील सेमी इंग्रजी शिक्षणाचा निर्णय रद्द करण्यात आला होता. या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने  सक्षम उपाय  सभागृहा समोर व पर्यायाने जनते समोर मांडण्याची मागणी केली आहे.


 
Top