गोर बंजारा एकता विचार एसोसिएशनच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री रवि महाराज राठोड यांची निवड
नळदुर्ग, दि.२१: किरण राठोड
गोर बंजारा एकता विचार एसोसिएशनच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नळदुर्ग (वसंतनगर) येथील रवि महाराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
गोर बंजारा एकता विचार एसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दि.१४ एप्रिल रोजी नियुक्तीचे पत्र रवि महाराज राठोड यांना दिले आहे.यानिवडी बद्दल फुलचंद राठोड(नाईक), विनायक जाधव, दिलीप संजय जाधव, राठोड, गणेश राठोड, शिवाजी नाईक, भानुदास राठोड, शेखर राठोड, काशिनाथ राठोड, योगेश जाधव, दत्ता जाधव, सुनिल चव्हाण, राजु पवार आदीसह अनेकांनी रवी महाराज राठोड यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.