जि.प.उपाध्यक्षा सौ.उषाताई रविंद्र गायकवाड यांची केंद्रीय प्राथमिक शाळेस सदिच्छा भेट
नळदुर्ग,दि.२२:
शहरातील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेस बुधवार रोजी धाराशिव जि.प.उपाध्यक्षा सौ.उषाताई रविंद्र गायकवाड यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य, पालक,विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी पालकांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा एकत्रिकरण करण्यास विरोध असल्याचे सांगितले.
शाळेची गुणवत्ता, पटसंख्या,आणि मुला-मुलींची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेच्या वतीने नगरसेविका श्रीमती सुमन ठाकूर यांनी सत्कार केला. शालेय समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले, सदस्य प्रमोद कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, मुख्याध्यापक मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. या भेटी दरम्यान गायकवाड यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला. स्वच्छता, शैक्षणिक वातावरण, पटसंख्या व गुणवत्तेबाबत शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक तानाजी जाधव, बलदेव ठाकूर, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे, नेताजी महाबोले, विजय ठाकूर यांच्यासह पालक उपस्थित होते.