विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा "बसवरत्न" पुरस्काराने होणार गौरव 

जेवळी,दि १८ :

मौजे जेवळी  ता. लोहारा  येथे  महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने येत्या दि.२१ एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा" जेवळी बसवरत्न पुरस्कार " देवुन गौरव करण्यात येणार आहे.

सुनिल बापूसाहेब देशपांडे - म्हाडा मुंबई , बाबा भिलू राठोड -  पोलिस स्टेशन बीड- ए. पी. आय.,
 विशाल होनाजे व पाडुरंग होनाजे - जेवळी -आदर्श शेतकरी, वसंत देविदास पोतदार -सामाजिक कार्यकर्ते - उप कार्यकारी अभियंता - बांधकाम विभाग लातूर, मल्लिनाथ सोळसे - आदर्श शिक्षक -जि. प. प्राथमिक शाळा मौजे दस्तापूर, संतोष उपासे ,न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गृह विभाग पुणे - संशोधन आदींना पुरस्कार जाहीर झाले आहे.

जेवळी गावाचे नावलौकिक मिळविलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने सन्मानित करण्याचा  उपक्रम
मंगळवार  दि. 21 एप्रिल   रोजी  जेवळी येथे रात्री ठिक 9 वाजता  करण्यात येणार आहे. 


 
Top