सिंदगाव येथे विधवा, निराधार, परित्यक्ता, एकल महिलांची सह विचार सभा संपन्न

नळदुर्ग,दि.२०:

:परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव/नळदुर्ग ता.तुळजापूर अंतर्गत साऊ महिला संघटनेचे वतीने शिंदगाव ता.तुळजापूर येथे  विधवा, निराधार,परित्यक्ता, एकल महिलांची सहविचार सभा घेण्यात आली.यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव तथा मिशन वात्सल्य समिती तुळजापूर चे अशासकीय सदस्य मारुती बनसोडे यांनी या महिलाना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

 गावातील महिलांच्या विविध समस्या समजून घेतल्या.यात 20 महिला उपस्थित होत्या. यात चार महिलाना घरकुल मिळाले नाही. दोन महिलांच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळत होता तो अचानक बंद झाला आहे. एक घटस्फोटीत महिला आहे तिला 5 ववर्षाचा मुलगा आहे कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही अशा अनेक समस्या समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली साऊ एकल महिला संघटना काम करीत आहे धाराशिव जिल्ह्यात विजय काका जाधव, मारुती बनसोडे हे कोरोना कालावधी पासून या प्रश्नावर काम करीत आहेत. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कमल पाटील यांनी परिश्रम घेतले आहे
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top