शेतातील बांध फोडुन शेतीचे नुकसान करणा-या  संबंधितावर कारवाईकरिता नळदुर्ग पोलिसांत शेतक-यांची धाव

नळदुर्ग,दि.२७: सुहास येडगे

 माझ्या शेतातील बांध फोडुन शेतीचे नुकसान करणाऱ्या सिरेंटीका रिन्युएबल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर कारवाई करावी याबाबतची तक्रार दि. 27 एप्रिल रोजी नुकसानग्रस्त शेतकरी सुहास येडगे यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली आहे.
        
  या तक्रार अर्जात सुहास येडगे यांनी म्हटले आहे की,कार्ला ता. तुळजापुर येथे गट नं. 244 मध्ये माझ्या मालकीची शेती आहे. सध्या कार्ला येथे सिरेंटीका रिन्युएबल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी टॉवर उभारणीचे तसेच 400 केव्ही उच्च दाब वाहिनी टाकण्याचे काम करत आहे. या कंपनीने मला कुठलीच पुर्वकल्पना न देता किंवा माझा समंतीशिवाय माझ्या शेतातील दोन मोठे बांध जेसीबीने फोडुन तसेच शेतात वाहणे घालुन माझ्या शेतीचे नुकसान केले आहे.माझ्या शेतीचे नुकसान करणाऱ्या रिन्युएबल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी या तक्रार अर्जात सुहास येडगे यांनी केली आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top