मुख्याध्यापिका  विमलताई देविदास राठोड यांना सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार सोहळ्याने निरोप 

नळदुर्ग,दि.३०:

सराटी ता. तुळजापूर येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमलताई देविदास राठोड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अणदुर जि.प. केंद्रिय  शाळेच्या सभागृहात दि. २८ एप्रिल रोजी भव्य सत्कार सोहळ्याने मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी श्रीमती. राउत एस. एम. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य डॉ. जितेंद्र कानडे , सराटीच्या सरपंच मल्लावाबाई व्हड्रे,  माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे,  माजी सरपंच, धनराज मुळे,  शालेय समितीच्या अध्यक्षा मिनाताई चंद्रकांत कलकोटे, केंद्रप्रमुख बारगळ एल एस आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत गीतानंतर निवृत्त होत असलेल्या श्री व सौ विमलताई शिवाजी जाधव यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यांनतर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर यावेळी नातेवाईक, सहकारी , पालक, अनेक प्रतिष्ठित नागरिकानी भेट वस्तू देत शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास  प्रगतशील शेतकरी दिपक घोडके, एमआयडिसी क्षेत्रिय अधिकारी  शिवाजी राठोड, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक थावरू  राठोड, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत राठोड,  हवालदार संदीप राठोड,  हवालदार विश्वनाथ राठोड, निवृत्त मुख्याध्यापक सखाराम राठोड, सहशिक्षक विठ्ठल चव्हाण, गोविंद चव्हाण, सुरेश चव्हाण, लालसिंग चव्हाण,  प्रकाश भुरे,निवृत्त मुख्याध्यापक, वसंतराव घोडकेसह, प्रतिष्ठित  नागरिक , शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  किरण राठोड, महेश राठोड, ऋषिकेश घुगे, राहुल घुगे, गणेश घुगे, शुभम चव्हाण, शशिकांत चव्हाण, महेश जाधव, श्रीराम चव्हाण, योगेश जाधव आदींनी पुढाकार घेतला.

 
Top