एन एम एम एस परीक्षेत परिणीती राजपूतचे घवघवीत यश; ठाणे जिल्ह्यात पाचवा क्रमांक
कल्याण,दि.०२: अशोकराव चव्हाण
मोहने-आंबिवली,ता.कल्याण येथील पाटील बाल मंदिर शाळेतील इयत्ता-८'वी एस-2 मधील विद्यार्थिनी परिणीती करसन राजपूत हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात एन.एम.एम.एस.(NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ठाणे जिल्ह्यातील VJ गटामध्ये पाचवा क्रमांक मिळवत परिणीतीने शाळा, पालक आणि बंजारा समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.
मेहनत,चिकाटी आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर परिणीतीने हे यश मिळवले.तिच्या या यशामुळे आंबिवली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परिणीतीला या परीक्षेसाठी शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिच्या पालकांनीही सतत प्रोत्साहन देत अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करून दिले. शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद तसेच बंजारा समाजातील मान्यवरांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु.परिणीतीच्या या यशाबद्दल तिचे व तिच्या पालकांचे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोक चव्हाण, समाजसेवक कैलास तंवर, मदन जाधव, पत्रकार-सतिष राठोड, समाजसेवक -शंकरशेठ चव्हाण, विष्णू पवार, समाजसेविका-अनुसया चव्हाण,सुनिता राठोड,यांच्यासह शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.