प्रदेश युवक कॉग्रेसच्या महासचिवपदी अभिजित  चव्हाण यांची फेर निवड         
           
 नळदुर्ग,दि.०४: प्रा. दिपक जगदाळे 

 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या प्रदेश कार्यकारणीत अभिजीत बाबुराव  चव्हाण यांची प्रदेश महासचिव म्हणून फेर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली.  130 जनाच्या या कार्यकारणीत प्रदेश महासचिवपदी निवड झालेल्या अभिजीत चव्हाण यांनी संघटनेत तळागाळातून काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.   

तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेचा हा एक आदर्श नमुना मानला जात असून अभिजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील  काँग्रेसमध्ये नवचैतन्य  निर्माण होईल असा विश्वास कार्यकर्त्यातून व्यक्त केला जात आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीप ,राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी अजय चिंकारा, राष्ट्रीय सचिव व सह प्रभारी नवज्योतसिंग सिद्धू आणि राष्ट्रीय सहसचिव सांभवी शुक्ला यांच्या मान्यतेने ही घोषणा करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
 अभिजीत चव्हाण यांनी सन २०२२ साली  महासचिव पदी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतमजुरांना काम मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याला अनुदान मिळावे म्हणून शासन दरबारी  मोर्चे काढली. तसेच भारत जोडो अभियानत राहुल गांधी यांच्यासोबत दोन वेळा सहभाग नोंदविल होता.  याचीच पावती म्हणून त्यांची पुन्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक महासचिवपदी फेरनिवड केली असून ही निवड सार्थ ठरवून यापुढेही महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन' सपकाळ, माजी अध्यक्ष नाना पटोले, युवकांचे स्फूर्तीस्थान अमित  देशमुख, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नव संजीवनी मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.
 
Top