गोकुळ शुगर फॅक्टरी, धोत्री, जि. सोलापूरच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा

नळदुर्ग,दि.१६:

शेतकऱ्याचा ऊस नेऊन सहा महिने झाले, तरीही अद्याप ऊस बिले जमा नाहीत. कारखान्याने आजपर्यंत तारखावर तारखा दिल्या, पण दिलेला शब्द पाळत नाहीत, ऊस बिले जमा करत नाही. यावर कहर म्हणजे 2024~25 हंगामातील ऊस बिलेही अद्याप स्थगित आहेत.
   
यामुळे आता ऊस उत्पादक  शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप खदखदत असून सदर कारखाना प्रशासनाच्या विरोधात  आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा ऊस पुरवठादार शेतकरयांनी दिला. तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी  गावातील हनुमान मंदीरात गुरुवार दि.14 मे रोजी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची बैठक संपन झाली.

त्याचबरोबर येत्या रविवार दि.17 मे रोजी तुळजापूर तालुक्यातील अणदूर व परिसरातील  अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बैठक खुदावाडी येथे हनुमान मंदीरात घेण्याचे ठरले असून त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते  अरविंद घोडके यांनी जाहिर केले. यावेळी ऊस पुरवठादार शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top