बोरी धरण कालव्याच्या  दगडी भिंतीची अज्ञाताकडून तोडफोड ; पाणी चोरी करण्याचा प्रयत्न; अज्ञात आरोपीविरु़ध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

नळदुर्ग, दि.३० :

येथील कुरनूर (बोरी धरण)  मध्यम प्रकल्पातून कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मात्र अज्ञात व्यक्तीने या कालव्याची तोडफोड करून पाणी चोरी करण्याचा प्रयत्न करत कालव्याच्या दगडी भिंतीचे नुकसान केले आहे. पाटबंधारे उपविभाग क्र.७ नळदुर्ग शाखेच्या वतीने याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीद्वारे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे शुक्रवार दि.२९ रोजी केली आहे.

गुरुवार दि. २८  मे रोजी दैनंदिन पाहणी दरम्यान कालव्याच्या साखरी क्रमांक ४७८० च्या भिंतीस बेकायदेशीपणे छिद्र पाडल्याचे आढळून आले.त्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी जात आहे . याप्रकरणी तक्रारी अर्जात संशयित गट क्र.२२२, २२४, २२५ व २२६ मधील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, तोडफोड करणाऱ्या व्यक्तीची ओळख किंवा माहिती नसल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सहाय्यक अभियंता यांच्यावतीने करण्यात आली आहे.
 
Top