खडतर हवामानावर मात; मुरूम सुपुत्रांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई

​मुरुम, दि.२८: डॉ सुधीर पंचगल्ले 

 कोल्हापूरच्या करवीर हायकर्स संस्थेच्या सात सदस्यांच्या पथकाने प्रतिकूल हवामानाचा सामना करत ५,३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरीत्या सर केला. या मोहिमेत तिरंगा फडकवत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

​मोहिमेचा प्रवास

१५ मे रोजी काठमांडू येथून मोहिमेला सुरुवात झाली. लुकला विमानतळापासून सुरू झालेला हा प्रवास फाकडींग, नामचे बाजार, तेंगबोचे, दिंगबोचे आणि लोबुचे मार्गे पूर्ण करत पथकाने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला. कस्तुरी सावेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत उणे १५ अंश सेल्सिअस तापमानासह विरळ ऑक्सिजन आणि तीव्र वाऱ्यांशी सदस्यांना झुंज द्यावी लागली. मोहिमेत राहुल गायकवाड (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी), प्रशांत सातपुते (जिल्हा माहिती अधिकारी), डॉ. सुप्रिया सातपुते, आप्पासाहेब मुंडासे (मुरूम), विशाल मेहता (कोल्हापूर) आणि नुपूर व अक्षय मठकर यांचा समावेश होता. स्थानिक मार्गदर्शक शेखर तमांग, योगेंद्र तमांग आणि प्रशांत तमांग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 फोटो ओळ :  मुरूम, ता. उमरगा येथील उद्योजक अप्पासाहेब मुंडासे (मुरूम) सुपुत्रांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई...
 
Top