३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन 
 
धाराशिव,दि.२६ : 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संमेलनाचे निमंत्रक डॉ.शरद गोरे यांनी दिली. 

दि.२९, ३० मे २०२६ रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये हे संमेलन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे,श. आमदार कैलास पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष भूषवत आहेत.
देशभरातून ९०० साहित्यिक या संमेलनास हजेरी लावणार आहेत,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या विचारपीठाला ख्यातनाम ग्रामीण साहित्यिक कै.प्रा.भास्कर चंदनशिव यांचे  तर संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारास संत गोरोबा काका यांचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार हे डॉ.शरद गोरे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन हि याप्रसंगी होणार आहे. या ग्रंथात देशभरातील १५६ कवींनी आपल्या काव्यातून दादांना आदारांजली वाहिली आहे,श. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे झुंजार सेनानी ( तुकाराम गंगावणे) राजकारण,पुढारी,( किशोर टिळेकर) कबीरांचे दोहे ( सुर्यकांत नामगुडे) विश्वकवी उन्मेष शेकडे ( प्रा.नंदकुमार बालुरे ) आदी ग्रंथांचे हि प्रकाशन होणार आहे, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष सन्मान केला जाणार आहे.मराठी ग्रामीण साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी प्रा.भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर साहित्य जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतिचिन्ह,शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर सुप्रसिद्ध साहित्यिक किशोर टिळेकर ( पुणे) यांना संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, साक्षी जमादार ( उमरगा) यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय युवा साहित्यरत्न पुरस्कार,दत्तात्रय भोंगळे ( सासवड) यांना तानूबाई बिर्जे राज्यस्तरीय पत्रकाररत्न जीवन गौरव पुरस्कार तर विनोद राऊत (मुंबई )गणेश मोरे ( मुंबई) यांना तानूबाई बिर्जे राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे,
२९ मे ला सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ग्रंथदिंडीस सुरुवात होणार आहे,त्याचे उद्घाटन साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर व मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top