वसंतराव नाईक  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसाद राठोड यांची निवड

नळदुर्ग, दि. २६ : 

हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शेतकरी हितचिंतक वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी नळदुर्ग शहरातील महामार्गावरील वसंतनगर गोलाई चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी बंजारा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हारिश जाधव, सुरेश राठोड, दत्ता राठोड,,आकाश जाधव आणि शिवाजी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जयंती उत्सवासाठी नूतन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन, मिरवणुकीची रूपरेषा, वृक्षारोपण कार्यक्रम करणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणे, सामाजिक सहभाग आणि विविध समित्यांच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील युवकांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जयंती उत्सव कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : प्रसाद (लखन) धनराज राठोड,

 उपाध्यक्ष : मोहन मानसिंग चव्हाण (उपसरपंच), धनु चांगु राठोड (माजी सरपंच) कार्याध्यक्ष : नितीन आप्पा राठोड, खजिनदार : मारुती पांडुरंग राठोड, आकाश कंठूराम जाधव, सचिव : प्रवीण अमृतराव चव्हाण, सहसचिव : लखन चव्हाण (उपसरपंच), मिरवणूक प्रमुख : गणेश वसंत राठोड, सुनील लक्ष्मण चव्हाण, संतोष चव्हाण (पुजारी तांडा), गुरुदेव मनू राठोड, प्रभाकर पांडुरंग जाधव, कुमार भीमराव राठोड (उपसरपंच), पृथ्वीराज शिवाजी चव्हाण आदींची निवड करण्यात आली आहे.

बैठकीच्या शेवटी १ जुलै रोजी होणाऱ्या जयंती उत्सवात बंजारा समाजासह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वसंतराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top