तुळजापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲड. अरविंद बेडगे यांची नियुक्ती; अनुभवी, अभ्यासू नेतृत्वाची पक्षाकडून निवड; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नळदुर्ग, दि. २८ जून : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नळदुर्ग येथील ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. अरविंद अप्पाराव बेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

गेल्या अडीच दशकांपासून वकिली व्यवसायात कार्यरत असलेले ॲड. बेडगे यांनी कायदेविषयक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि संघटनात्मक कामातही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. सर्वधर्मीय समाजात त्यांची अभ्यासू, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख आहे.त्याचबरोबर माजी जिल्हा अध्यक्ष ॲड.धिरज पाटील यांच्या सहकारी मित्र म्हणून सर्वश्रुत आहे.

ॲड. बेडगे यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य, तुळजापूर वकिल संघाचे अध्यक्ष तसेच वीरशैव सभा संघटना (पुणे) यांच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. याशिवाय ते गेल्या आठ वर्षांपासून भारत सरकारचे नोटरीधारक म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या संघटन कौशल्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि पक्षाच्या जनाधारात वाढ होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ॲड. अरविंद बेडगे यांच्या निवडीबद्दल नळदुर्ग व तुळजापूर परिसरातील विविध सामाजिक, राजकीय आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

111111
ॲड अरविंद अप्पाराव  बेडगे यांची तुळजापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

नळदुर्ग, दि. २८ जून :

 राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नळदुर्ग येथील अँड अरविंद बेडगे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.
अडीच दशकांपासून वकिली व्यवसाय करणारे अँड अरविंद बेडगे हे सर्वधर्मीयामध्ये लोकप्रिय आहेत. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य, तुळजापूर वकिल संघाचे अध्यक्ष, वीरशैव सभा संघटना ( पुणे) तुळजापूर तालुकाध्यक्ष म्हणुन काम पाहिले आहे.तर भारत सरकार नोटरीधारक म्हणून गेल्या ८  वर्षापासून आहे.

अभ्यासू कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या बेडगे यांची नियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top