कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
नळदुर्ग, दि. ३० जून :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी नळदुर्ग शहरातील गोलाई चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामाजिक उपक्रमात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहे. युवकांसह सर्व पात्र नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आयोजकांनी नमूद केले आहे.
रक्तदात्यांचा उत्साह वाढावा यासाठी प्रत्येक रक्तदात्यास रक्तदानाचे प्रमाणपत्र, टेबल फॅन तसेच पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात येणार आहे.
या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समस्त गावकरी मंडळ, वसंतनगर (नळदुर्ग) यांच्या वतीने करण्यात आले असून, रक्तदान करून मानवतेच्या सेवेत योगदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.