बालाघाट महाविद्यालयात इयत्ता ११ वी प्रवेश नोंदणीस सुरुवात; विद्यार्थ्यांना मोफत अर्ज भरण्याची सुविधा

नळदुर्ग,दि. १० जुन:

नळदुर्ग शहरातील बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वीच्या प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कला, विज्ञान व वाणिज्य शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मोफत अर्ज (भाग-१) भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी दहावीच्या गुणपत्रिकेचा क्रमांक, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल आयडी सोबत आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महाविद्यालयाने विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.

महाविद्यालयात अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकवर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल वर्गखोल्या, समृद्ध ग्रंथालय तसेच विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय द्विभाषिक अभ्यासक्रम, फिशरी सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विषयांचीही सुविधा देण्यात आली आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेचे मोफत प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राठोड यांनी केले आहे. प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी संबंधित शाखांच्या समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य  राठोड यांनी केले आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top