अनिल आगलावे यांना राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार प्रदान 

 तुळजापूर,दि.०५:

 तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील अनिल आगलावे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पनवेल (रायगड) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा "डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले.

पनवेल येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल नाचपल्ले, महिला राज्याध्यक्ष रेखा सुडे, राज्य सरचिटणीस संतोष भोजने, महिला राज्य सरचिटणीस विनया जाधव, राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, धाराशिव जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर,सचिन राऊत, सतीश हुंडेकरी 
यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क व संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी पत्रकारिता आणि समाजकारण या दोन्ही माध्यमांतून अनिल आगलावे यांनी प्रदीर्घ काळ निस्वार्थपणे कार्य केले आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविणे तसेच गरजू घटकांना मदतीचा हात देणे या त्यांच्या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.

अनिल आगलावे हे पुजारी नगर फाउंडेशनचे संस्थापक सदस्य, संस्कार भारती धाराशिव जिल्हा कार्यकारिणी सदस्य, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच आमदार संवाद मंचचे मुख्य समन्वयक म्हणून विविध क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार 
मिळाल्याने सर्वत्र आभिनंदन केले जात आहे.
 
Top