नळदुर्ग शहरासह श्री क्षेत्र तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करण्या-या कुरनूर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पातील  पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याची नगराध्यक्ष बसवराज धरणे यांची जिल्हाधिकारीकडे मागणी

धाराशिव,दि.०२ जुन 

नळदुर्ग शहरासह श्री क्षेत्र तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कुरनूर (बोरी धरण) प्रकल्पातील  पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवार दि.०२ जुन रोजी केली आहे.



निवेदनात पुढे नमुद केले आहे की, नळदुर्ग व तुळजापूर शहराला बोरी धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे या वर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विषयक संस्थांनी वर्तविली आहे. या दोन्ही शहरात दररोज बाहेरील अनेक नागरीक येत असल्याने या शहरांची  लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे बोरी धरणातुन होत असलेला पाणी उपसा तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. नळदुर्ग नगर परिषदेने यापुर्वी देखील दि.25 मे रोजी बोरी धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्या बाबत आपल्याकडे विनंती केले आहे.

तरी नळदुर्ग व तुळजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोरी धरणातील पाणी आरक्षीत ठेवुन इतर उपसा बंद करण्याची मागणी केली आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top