आषाढी वारीच्या वाटेवर भक्तीचा गोडवा; माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्याकडून वारकऱ्यांसाठी अल्पोपहार सेवा
नळदुर्ग, दि. ७ जुलै :
आषाढी वारीसाठी नळदुर्ग येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींसाठी माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अल्पोपहाराची व्यवस्था करून सेवाभावाची परंपरा कायम राखली.
सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या अहंकारी यांनी वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देत भक्ती आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवून आणला.
यावेळी त्यांच्या निवासस्थानी अभंग गायन व आरतीचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक तानाजी जाधव, आकाश कुलकर्णी, नगरसेविका राणीताई शिवाजी सूरवसे, मीनाताई काळे, माजी नगरसेविका सुप्रियाताई पुराणिक, सुप्रियाताई परळकर, पत्रकार विलास येडगे, भाजप युवा नेते सुशांत भूमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाचे प्रमुख अरविंद माने, मिलिंद भूमकर, बंडाप्पा कसेकर, दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानोबा गव्हाणे, महेश कलशेट्टी, सूक्ष्म माने, सुमन किल्लेदार, शोभाताई ठाकूर, वनमाला अहंकारी, लता साळुंखे, सुनंदा जाधव, जयश्री जाधव, कमल सूरवसे, विमल काळे, निर्मला काळे, शशिकला पवार, सोनल किल्लेदार, भक्ती सूरवसे यांच्यासह अनेक वारकरी या सेवेत सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश नाईक, संतोष नाईक, शिवाजी सूरवसे, नंदू पोतदार, प्रदीप ग्रामोपाध्ये, राजू वैद्य, संदीप वैद्य, सचिन भूमकर, सतीश जाधव, पिंटू जाधव, विलास पाटील आणि सुनील गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक विनायक अहंकारी म्हणाले, "आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. ही सेवा पुढेही अविरत सुरू राहील."
नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी विनायक अहंकारी यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेशही देण्यात आला.