नळदुर्ग जि.प. प्रशालेचा शिष्यवृत्ती परीक्षेत दबदबा; दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र; अरबिया शेख प्रथम, गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

नळदुर्ग, दि. २६ जुलै :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे. यंदा शाळेतील तब्बल १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परीक्षेत अरबिया माजिद शेख हिने २४६ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ अमीना फैयाज शेख (२३० गुण), अबीरा वसीम मोज्जन (२२६), फरहान मुन्ना फकीर (२२२), सानिया मझहर शाह (२०४), अलिजा एहसान काझी (१९८), अल्फिया जमीर शेख (१९४), अलिया अहमद शेख (१९४), नौमान राजेभाई पठाण (१६८) आणि नूरजहान ख्वाजा शेख (१६६) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक निजामोद्दीन इनामदार, शिक्षिका शमशाद बेगम दखनी, सय्यद तस्नीम, परिचर युसूफ शेख तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व परिश्रम मोलाचे ठरल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच शाळेच्या शिक्षकवृंदाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, जिल्हा परिषद प्रशालेने नळदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता आणि यशाची परंपरा कायम राखल्याची भावना व्यक्त होत आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top