केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव; गुणवंतांना कौतुकाची थाप; पालक-शिक्षकांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा

नळदुर्ग, दि. २८ जुलै :

नळदुर्गच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात गुणगौरव सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी इयत्ता पाचवीतील ओवेस शेख, तृष्णा सुरवसे, विद्या पन्हाळकर व रोशनी राठोड तसेच इयत्ता चौथीतील आदिल इनामदार आणि क्रांतिवीर बागडे या विद्यार्थ्यांचा बीट नळदुर्ग-अणदूरचे विस्ताराधिकारी राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले, उपाध्यक्षा कविता कलशेट्टी, सदस्या मर्जिना शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विस्ताराधिकारी राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भविष्यातही मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले. तसेच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांनीही गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत अशाच यशाची परंपरा कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top