जय हनुमान गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन हळदे, उपाध्यक्षपदी राहुल ठाकूर व कोषाध्यक्षपदीअजय कांबळे यांची सर्वानुमते निवड
नळदुर्ग, दि. २४ ऑगस्ट :
शास्त्री चौक येथील जय हनुमान तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन हळदे, तर उपाध्यक्षपदी राहुल ठाकूर व किरण धुसा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी अजय कांबळे व नीरज गहेरवार, सचिवपदी लखन कोकणे, तर सहसचिवपदी आकाश कोकणे यांची निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, श्री गणरायाची आकर्षक मूर्ती आकाश दिंगबर घोडके यांनी देण्याचे जाहीर केले. जय हनुमान तरुण गणेश मंडळाने यापूर्वी नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नर-मादी देखाव्यासाठी धाराशिव जिल्हा पोलिस प्रशासनाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. यंदाही समाजोपयोगी व प्रबोधनात्मक ‘हटके’ देखावा सादर करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ तथा शेतकरी संघर्ष समितीचे नेते सरदारसिंग ठाकूर यांनी सांगितले.
‘श्री गणरायाच्या आशीर्वादाने मंडळाच्या माध्यमातून शहरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना नवी दिशा मिळावी,’ अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीस सरदारसिंग ठाकूर, प्रभाकर घोडके, बाबा कटके, शंकर वाघमारे, किरण ठाकूर, महेश वाघमारे, ज्ञानेश्वर घोडके, बबलू दस, जमन ठाकूर, महादेव फडताळे, मंगेश घोडके, आकाश घोडके, रवी ठाकूर यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.