चार गावांतून एकाचवेळी भगवा हाती; तुळजापूर तालुक्यातील युवकांची शिवसेनेत जोरदार एन्ट्री!

ओमराजे निंबाळकरांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा दणदणीत सोहळा; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राजकीय हालचालींना वेग

धाराशिव, दि. १६ ऑगस्ट : 

तुळजापूर तालुक्यातील राजकीय वातावरणाला रविवारी नवे वळण मिळाले. अणदूर, फुलवाडी, खुदावाडी आणि चिवरी या चार गावांतील युवकांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत रविवार रोजी  धाराशिव येथे जाहीर प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘भगवा हाती, शिवसेनेच्या वाटेवर!’ अशा उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या प्रवेश सोहळ्याने तुळजापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले.  शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

ओमराजेंच्या नेतृत्वावर विश्वास; युवकांचा भगव्याकडे वाढता ओढा

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विकासकामांची धडाडी, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि ग्रामीण भागाशी असलेला थेट संपर्क यामुळे युवकांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाल्याचे पक्ष प्रवेशातून दिसून आले. चार गावांतील एकाचवेळी झालेल्या या प्रवेशामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या पक्षप्रवेशामुळे ‘गावागावांत शिवसेनेची मोट बांधण्याच्या’ अभियानाला वेग मिळाल्याचे मानले जात आहे. विशेषतः युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग हा शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.


अणदूर, फुलवाडी, खुदावाडी आणि चिवरी ही तुळजापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची गावे मानली जातात. या चारही गावांतील प्रभावी कार्यकर्ते एकाचवेळी शिवसेनेत दाखल झाल्याने स्थानिक राजकारणातील समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत नवनियुक्त शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. युवा नेते ऋषिकेश मगर, काटीचे सरपंच सुजित हंगरकर, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विकास जाधव, बाळू घुगे, गणेश देवसिंगकर, राहुल मुळे आणि शिवराज घोडके यावेळी उपस्थित होते.

हे प्रमुख कार्यकर्ते शिवसेनेच्या गोटात
रतन बनसोडे, महादेव कर्पे, प्रवीण गुंड, बालाजी कांबळे, मल्लिनाथ घोडके, दत्तात्रय एडके, तानाजी सोमवसे, काशिनाथ कांबळे, महेश लंगडे, मारुती हिप्पर्गे, मल्लिनाथ हजारे, संकेत कांबळे, चंद्रकांत स्वामी, अक्षय हजारे, योगेश कांबळे, रोहित धबाले, बलभीम गायकवाड, नंदू काळुंके, राजू इट्टलकर, महादेव शिंदे आणि मारुती बनसोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top