तिरंग्याच्या जयघोषाने नळदुर्ग दुमदुमले; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भव्य रॅली

नळदुर्ग, दि. १३ ऑगस्ट :

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारी भव्य तिरंगा रॅली गुरुवारी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात उत्साहात पार पडली. हातात तिरंगा ध्वज घेऊन "भारत माता की जय", "वंदे मातरम्"च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. या रॅलीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले.
राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि युवकांमध्ये राष्ट्रभावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत जिल्हा परिषद व खासगी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, माजी सैनिक, नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
 
रॅलीपूर्वी नगरपालिका कार्यालय परिसरात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर तिरंगा ध्वज फडकावत विद्यार्थी, माजी सैनिक व नागरिकांच्या सहभागाने रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे शास्त्री चौक, चावडी चौक मार्गे ऐतिहासिक किल्ला गेट येथे रॅलीचा समारोप झाला.

यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, भाजपचे सुशांत भूमकर, जि.प. सभापती सिद्धेश्वर कोरे, तालुकाध्यक्ष सौ. रंजना राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष विलास राठोड, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, नगरसेवक दत्तात्रय दासकर, निरंजन राठोड, शशिकांत पुदाले, रिजवान काझी, प्रवीण गायकवाड, मारुती खारवे, आकाश कुलकर्णी, इमाम शेख, किशोर धुमाळ, भिवा इंगोले, नगरसेविका मिनाक्षी काळे, राणी सुरवसे, बलदेवसिंग ठाकूर, सुनील उकंडे, सुदर्शन पुराणिक, सुनील (बबन) चौधरी, श्रमिक पोतदार, धिमाजी घुगे, किशोर नळदुर्गकर, पद्माकर घोडके, अक्षय भोई, बंडू पुदाले, सिकंदर काझी, मुदस्सर शेख, स्वीय सहाय्यक अबुल हसन रजवी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, रॅलीत सहभागी झालेल्या बालाघाट महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत मार्गावरील परिसराची स्वच्छता केली. विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे तिरंगा रॅलीला देशभक्तीचा उत्स्फूर्त रंग चढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top