ईद-ए-मिलाद नबी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शायान समिउल्ला काझी; नळदुर्गमध्ये उत्सवाची जय्यत तयारी
नळदुर्ग, दि. १० ऑगस्ट :
नळदुर्ग शहरात साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद नबी उत्सव समितीची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी शायान समिउल्ला काझी यांची एकमताने निवड करण्यात आली.
समितीच्या उपाध्यक्षपदी युनूस इनामदार व युसुफ शेख यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून मुस्तफा सय्यद, झीया महसूलदार, समीर सय्यद, सिद्दीक शेख, मुजम्मिल कुरेशी, सलमान कुरेशी, माजिद शेख, इमरान जागीदार, अफताब कुरेशी, हाफिज मुजफ्फर शेख, हेरार काझी, हाफिज मुदस्सर हकीम कुरेशी, मुक्तदिर बडेवाले आणि अब्दुल सलाम शेख, अझर शेख यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.
यंदाचा ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्सव धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. उत्सवानिमित्त सकाळी विविध ठिकाणी भाविकांसाठी शरबत वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर धार्मिक कार्यक्रम पार पडतील. दुपारच्या सत्रात शहरातून पारंपरिक व भव्य ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नुतन अध्यक्ष शायान काझीसह पदाधिका-यांनी सांगुन या उत्सवात नागरिकांनी सहभागी होऊन शांतता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे आवाहन केले आहे.