एमआयएममध्ये ‘इनकमिंग’; आपचे शहराध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
नळदुर्ग शहरासह तुळजापूर तालुक्यात संघटन विस्ताराला वेग

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :

धाराशिव जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या हालचालींना वेग आला असून, नळदुर्ग शहरासह तुळजापूर तालुक्यात पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची बैठक मंगळवारी (दि. २९) पार पडली. यावेळी आम आदमी पार्टीचे नळदुर्ग शहराध्यक्ष वसीमखान पठाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.

एमआयएमचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नळदुर्ग शहर आणि तुळजापूर तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाचे ध्येय व धोरण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, आम आदमी पार्टीचे नळदुर्ग शहराध्यक्ष वसीमखान पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह एमआयएममध्ये प्रवेश केला. तसेच इटकळ व निलेगाव येथील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत इमाम शेख, शरीफ शेख, नुमान शेख, एजाज शेख, बसोद्दीन शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

जिल्हा कार्यकारिणीसह विविध पदांची नियुक्ती प्रदेश पातळीवरील मान्यतेनंतर
धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने जिल्हा कार्यकारिणीसह विविध पदांवरील नियुक्त्या प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश पातळीवरील मान्यतेनंतर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस हैदर कुरेशी, अजहर शेख, शायन काझी, जाफर बागवान, अल्ताफ शेख, अखलाख शेख, इमरान पठाण, समीर पठाण, आहात काझी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top