पोलीस ठाणे परिसर चकाचक; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
संत निरंकारी फाउंडेशन व उमरगा शहर पोलिसांचा संयुक्त उपक्रम

मुरूम, ता. उमरगा, दि. ६ :

शिक्षकांच्या मार्गदर्शनातून सुसंस्कृत नागरिक घडतात, तर स्वच्छ व निरोगी वातावरणातून उत्तम समाजनिर्मितीला चालना मिळते, हा संदेश देत उमरगा शहर पोलीस ठाणे आणि संत निरंकारी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी  पोलीस ठाणे परिसरात भव्य स्वच्छता अभियान व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.

पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमाची सुरुवात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि संत निरंकारी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून पोलीस ठाणे परिसराची स्वच्छता करून केली. परिसरातील कचरा, अनावश्यक गवत व अस्वच्छता दूर करून ठाण्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ व चकाचक करण्यात आला.
यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पोलीस ठाणे परिसरात विविध छायादार व शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आली.

 वृक्षारोपणासोबतच लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणप्रेमाचा अनोखा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी फाउंडेशनचे मुरूम ब्रँच मुखी दयानंद साखरे, उमरगा प्रबंधक लक्ष्मण पांगे, सेवादल इंचार्ज बिरू बंदीछोडे, दत्तात्रय बोडरे, कमलाकर पांचाळ तसेच सेवादल महिला प्रतिनिधी मंगल बनसोडे, आशा भुजबळ, छाया बिराजदार, सुरेखा जांभळे, गोकर्णा स्वामी, सरस्वती जाधव, पद्मीन माने, निर्मला कोरचगावकर, अनिता आष्टे, ज्योती अंबुलगे, संगीता बनसोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी पोलीस विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिराजी तायवाडे, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे यांच्यासह पोलीस कर्मचारी चंद्रकांत चव्हाण (दाळींब), हरिकिशन पवार (येळी), भास्कर पाटील, कमलाकर जाधव, हणमंत पोतदार, बालाजी बिराजदार, राजू पाटील, काशिनाथ आष्टे, हरिभाऊ बिराजदार, दशरथ कोकणे, दिलीप जांभळे, हणमंत पंडित, विजय बिराजदार, महेश वासगी, व्यंकटेश कलशेट्टी, संगमेश्वर स्वामी, व्यंकट माळी, महादेव अंबुलगे, व्यंकट कोराळे, अनिल बनसोडे, सुधाकर हिराळे, कल्लेश्वर पांचाळ, सुरेश कोळी, तुकाराम शेवाळे, व्यंकट मंडले, सुरेश मंडले, हणमंत मंडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिसांची शिस्त आणि संत निरंकारी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचे श्रमदान यांचा सुरेख संगम असलेल्या या उपक्रमाचे उमरगा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून नागरिकांना मिळाला.


 
Top