आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
रुग्णांना फळवाटप, गोशाळेला चारा; जनावरांसाठी पाण्याचे हौद आणि निवासी मुलांसोबत स्नेहभोजन
नळदुर्ग, दि. ३० ऑक्टोंबर :
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी नळदुर्ग शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष बसवराज धरणे आणि नळदुर्ग शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित या उपक्रमांतून रुग्णसेवा, गोसेवा आणि गरजू मुलांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
रुग्णसेवा अन् मुक्या जीवांसाठी पुढाकार
वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी मुक्या जनावरांसाठी सिमेंटचे पाण्याचे हौद बसविण्यात आले . तसेच दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन चिवरी येथील गोशाळेतील गायींसाठी एक ट्रॉली चारा देण्यात आले.
नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ संस्थेतील निवासी मुलांसाठीही स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव, बांधकाम सभापती शशिकांत पुदाले, नगरसेवक निरंजन राठोड, रिजवान काझी, नगरसेविका राणी सुरवसे, छमाबाई राठोड, भाजपचे सुशांत भूमकर, माजी नगरसेवक सुधीर हजारे, बलदेव ठाकूर, सुनील चौधरी, प्रवीण गायकवाड, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, विनायक पुदाले, सिकंदर काझी, अभिजित लाटे, संजय जाधव, स्वप्नील काळे, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, सागर हजारी, जमन ठाकूर, अकबर शेख, चिवरी गोशाळेचे कुशाल, संदीप गायकवाड, मुदसर शेख, अमर बनसोडे, श्री. कांबळे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक कार्याची जोड मिळाली.