देवसिंगा (नळ) च्या विकासाला गती; विविध विकासकामांचा धडाका
आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच युवराज पाटील यांचा पाठपुरावा

नळदुर्ग, दि. ६ : शिवाजी नाईक

आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (नळ) ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकासकामांची घौडदौड सुरू आहे. सरपंच युवराज भीमाशंकर पाटील यांच्या पुढाकारातून गावातील विविध वस्ती, तांडे आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित कामांना चालना मिळाली आहे.

सेवालालनगर तांड्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून सभागृहाचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे तांड्यातील सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे.
भिमनगरमध्ये मूलभूत सुविधांना प्राधान्य
भिमनगर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेंतर्गत बंदिस्त गटार बांधकाम आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते व स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

पंधराव्या वित्त आयोगातून विविध कामे
पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावात बंदिस्त गटार बांधकाम, महिला बचतगटांच्या ‘उमेद’ कार्यालयातील सभागृहाची दुरुस्ती तसेच समाजमंदिराच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. याशिवाय सेवालालनगर तांड्यात नवीन बोअरवेल घेण्यात आली असून, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

देवसिंगा–निलेगाव रस्त्याला मोठी चालना
गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या निलेगाव ते देवसिंगा (नळ) रस्त्याच्या कामालाही चालना मिळाली आहे. यामुळे गावकऱ्यांची वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असून, शेतमालाची ने-आण, विद्यार्थ्यांचा प्रवास आणि दैनंदिन कामांसाठी होणारी ये-जा अधिक सोयीची होणार आहे.
देवसिंगा (नळ) ग्रामपंचायतीअंतर्गत विविध भागांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच सार्वजनिक बांधकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि दळणवळणाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या गरजा ओळखून विकासकामांचा पाठपुरावा करण्याची भूमिका सरपंच युवराज पाटील यांनी घेतल्याचे सांगितले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top