Tuesday, 11 September 2012

नळदुर्गच्‍या भुईकोट किल्‍लाची पर्यावरण व सांस्‍कृतिक मंञीकडून पाहणी

नळदुर्ग – मराठवाडयातील नळदुर्ग येथील इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेल्‍या भुईकोट किल्‍ल्‍याची खासगी सामाजिक संस्‍थामार्फत सुधारणा करुन देशातील एक उत्‍कृष्‍ट पर्यटन केंद्र निर्माण करण्‍यासाठी गड किल्‍ल्‍याचे संरक्षण व पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी शासनाने हा किल्‍ला पर्यटकांसाठी खासगी सामाजिक संस्‍थाकडे बांधा वापरा हस्‍तांतरण करा, या तत्‍त्‍वाने भाडयाने देवून किल्‍ल्‍याची जपवणूक करण्‍याबाबत मंगळवार दि. 11 सप्‍टेंबर रोजी पर्यावरण व सांस्‍कृतिक खात्‍याचे कॅबीनेट मंञी ना. संजय देवताळे, पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍यासह पुरातत्‍व खात्‍याच्‍या अधिका-यांनी किल्‍ल्‍यास भेट देवून पाहणी केली.
पर्यावरण व सांस्‍कृतिक मंञी ना. संजय देवताळे, पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण, खा. पद्मसिंह पाटील, पुरातत्‍व खात्‍याचे संचालक संजय पाटील, सहायक संचालक राहुल भोसले, अवल सचिव ना.सी. भोगे, जिल्‍हा कॉंग्रेस अध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्‍हा कार्याध्‍यक्ष सुरेश देशमुख, तहसिलदार व्‍ही.एल. कोळी, पुरातत्‍व खात्‍याचे माजी संचालक जामखेडकर, गोपाळ गोदे, मजूर संघाचे अध्‍यक्ष नारायण ननवरे, युनिटी मल्‍टीकॉनचे संचालक कफील मौलवी, अनिल पाटील, नगराध्‍यक्ष नितीन कासार, मुख्‍याधिकारी राजेश जाधव, माजी उपनगराध्‍यक्ष नयर जहागिरदार, पं.स. उपसभापती प्रकाश चव्‍हाण यांच्‍यासह अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी ना. देवताळे म्‍हणाले की, स्‍मारकाचे जतन व संरक्षण करणे शासनाची जबाबदारी आहे. शासनाने किल्‍ला सर्किट योजनांतर्गत निधी उपलब्‍ध केले आहे. पैसाची कमतरता नाही. परंतु जतन संगोपन करीत असताना ठेकेदारानी त्‍यांच्‍याकडून कशी वेगाने कामे करुन घेता येईल, हा आमचा प्रयत्‍न आहे. पर्यटकाना आकर्षित करण्‍यासाठी ज्‍या सुविधा निर्माण करायच्‍या आहेत, त्‍या सुविधा आम्‍ही करु, अशी ग्‍वाही देवून ऐतिहासिक वारसा जतन करून त्‍याचे महत्‍व, कामाचा दर्जा हेही पाहणे गरजेचे आहे. त्‍याचबरोबर किल्‍ल्‍याचे मूळ स्‍वरूप जशास तसे ठेवण्‍यात येणार आहे. पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विदयार्थी, बालक व आंतरराष्‍ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी विकासात्‍मक कामे करण्‍याची शासनाची योजना असल्‍याचे त्‍यानी सांगितले. किल्‍ल्‍यात झालेल्‍या कार्यक्रमात प्रमुख मान्‍यवरांचे नगरपालिकेच्‍यावतीने व युनिटी मल्‍टीकॉनच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आले.
यावेळी प्रे‍क्षणीय नरमादी (सध्‍या बंद) धबधबा, पाणी महाल, रंगमहाल, उपली बुरूज, नव बुरूज, परंडा बुरूज, बारादरी आदीसह इतर परिसराची प्रमुख मान्‍यवरांनी पाहणी केली. या कार्यक्रमाचे सुञसंचालन उपनराध्‍यक्ष शहबाज काझी यांनी केले तर आभार कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी यांनी मानले.
नळदुर्ग किल्‍ला पाहण्‍यासाठी दरवर्षी पाच लाखाच्‍या जवळपास पर्यटक भेटी देत असतात. परंतु येथे त्‍यांना पुरातत्‍व खात्‍याकडून साधी पिण्‍याच्‍या पाण्‍याचीही व्‍यवस्‍था केली गेली नाही. पर्यटकांना आकर्षित करण्‍याकरिता या किल्‍लयात जलतरण तलाव, बोटींग, पंचतारांकित हॉटेल, यासह सर्व सुविधा पर्यटकांना उपलब्‍ध करुन दिल्‍यास आणखी पर्यटक आकर्षित होवून पुरातत्‍व विभाग व शासनास मोठा महसुल मिळण्‍याची शक्‍यता पर्यटकांतून वर्तविली जात आहे.

Labels: