नळदुर्गच्या महाविदयालयास विविध क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्णपदके
नळदुर्ग -: येथील बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी बाभळगाव येथे राष्ट्रीय छात्रसेनांतर्गत पार पडलेल्या ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये झालेल्या विविध स्पर्धेमध्ये पाच सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले आहे. या स्पर्धेत बेस्ट कॅडेट व बेस्ट परेड कमांडर म्हणून ऋषिकेश घुगे यास दोन सुवर्णपदके, प्रितम राठोड यास बेस्ट कॅडेट म्हणून एक सुवर्णपदक तसेच लहू भोसले व योगेश भोसले या विदयार्थ्यांनी कबडडीमध्ये दोन सुवर्णपदके मिळविली आहेत. या विदयार्थ्यांना कंपनी कमांडर प्रा. प्रवीण भाले यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, सि.ना. आलुरे गुरुजी, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, उपप्राचार्य एन.एम. माकणे, प्रा. एस.व्ही. चंदनशिवे, डॉ. उमाकांत चनशेटटी यांनी अभिनंदन केले आहे.
Labels: नळदुर्ग

<< Home