मुंबई येथील पिडीत छायाचित्रकार तरुणीला शासनाचे सर्वतोपरी सहाय्य : मुख्यमंत्री
औरंगाबाद -: मुंबई येथील छायाचित्रकार तरुणीवर झालेला अत्याचार ही दुर्देवी व निंदाजनक घटना आहे. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध नोंदवतो, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. याप्रकरणी मुंबई पोलीसांना कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मार्फत सतत पाठपुरावा केला जात आहे. या दुर्देवी पिडीत तरुणीला शासन सर्वतोपरी सहाय्य करेल. तसेच तिच्यावरील उपचारांचा सर्व खर्च शासन करेल. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत, असे श्री. चव्हाण म्हणाले.
Labels: प्रदेश


<< Home