बँक फोडून दरोडेखोरांनी केले 11 लाख रुपये लंपास

कळंब (भिकाजी जाधव) :- अंदोरा (ता. कळंब) येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या शाखेत दरोडेखोरांनी दरोडा टाकून रोख रक्कम सुमारे 11 लाख 45 हजार 110 रुपये लंपास केले. ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. या घटनेमुळे कळंब तालुक्यात खळबळ उडाली असून बँकाची सुरक्षितता धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.
स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या अंदोरा (ता. कळंब) शाखेत काही अज्ञात दरोडेखोरांनी गॅसकटरच्या साहय्याने शटर उचकटून बँकेतील तिजोरी फोडली. या तिजोरीमधील रोख रक्कम सुमारे 11 लाख 45 हजार 110 रुपये लंपास केले. ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बँक मॅनेजर प्रकाश उत्तराम देशपांडे (वय 59, रा. आनंदनगर, उस्मानाबाद, हल्ली मुक्काम ढोकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कळंब पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे हे करीत आहेत.
दरम्यान, श्वान पथकास प्राचारण करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
( छायाचित्र - शरद अडसूळ, कळंब)

Labels: पोलीस डायरी

<< Home