Tuesday, 28 January 2014

एक महिन्याची कैद आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : निष्काळजीपणे वाहन चालवून एकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अहमद मुजावर यांना बार्शी येथील फौजदारी न्यायदंडाधिकारी व्ही.बी.मुल्ला यांनी एक महिना कैद व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
    उध्दव राऊत (रा. काकडे वस्ती, ता.बार्शी) असे अपघातात जखमी व रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. १३ फेब्रुवारी २००५ मध्ये सदरचा अपघात झाला असून लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या राऊत यांच्या अंगावर मुजावर यांनी निष्काळजीपणे दुचाकी वाहन येऊन धडकल्याने सदरचा अपघात झाला. वैराग पोलिसांनी बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर दहा साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या.

Labels: