Friday, 31 January 2014

जकेकुरवाडी शाळेला पुरस्‍कार मिळाल्‍याद्दल शिक्षकांचा सत्‍कार

उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा गुणवत्‍ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळा स्‍वयं मूल्‍यमापनात जिल्‍हा परिषद जकेकुरवाडी शाळेला पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे व शाळा व्‍यवस्‍थापन समितीच्‍या सर्व सदस्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
          यावेळी सभापती अक्षरताई सोनवणे, उपसभापती बाबा काझी, जि.प. सदस्‍य धनश्री ढंगे, जि.प. सदस्‍या विजया गायकवाड, पं.स. सदस्‍य वाकडे गुरुलिंग, गटविकास अधिकारी बी. खांडागळे, मुल्‍यांकन समिती सदस्‍य गुरुगुरे, पं.स. सदस्‍या रेखा कांबळे, गटशिक्षणाधिकारी सुधा साळुंके, विस्‍ताराधिकारी एस.एम. राऊत, डी.बी. बनसोडे आदीजण उपस्थित होते.

Labels: