Tuesday, 28 January 2014

राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलच्यावतीने उस्‍मनाबाद येथे जिल्‍ह्यातील कार्यकर्त्‍यांचा मेळावा आयोजित करण्‍यात आला होता. या मेळाव्‍यास उत्‍तम प्रतिसाद मिळाला.
    उस्‍मानाबाद येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेलचे प्रदेश सरचिटणीस मनोहरराव वाडेकर, जिल्हाध्यक्ष पांडुरंग लाटे, उपाध्यक्ष दयानंद राठोड, युवक प्रदेश सरचिटणीस विद्यानंद राठोड आदींची उपस्थिती होती.
    यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील बोलताना म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी सोडविण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न केला जात असून, येत्या काळात युवकांनी स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे रहावे. यासाठी पक्षाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही ते म्‍हणाले.
    यावेळी डिकसळ (ता. कळंब) येथील राहुल रजपूत, मुफीक पठाण, नाना पुरीजनक जाधव, अक्षय कानडे, ऋषिकेश टकले, किरण नाईकवाडे, धनंजय बोंदर, , समीर पठाण, गजानन शिंपले, प्रणव भालेराव, किशोर कांबळे, सूरज धावारे, सचिन जाधवर, शशिकांत गायकवाड, अजय वाघमारे, अक्षय शिंदे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Labels: