उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व केंद्र -राज्य शासनाची कार्यालये,निमशासकीय कार्यालये,शासकीय अंगीकृत उपक्रम,महामंडळे,स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या खाजगी आस्थपनेत 10 किंवा अधिक मनुष्यबळ आहे अशा आस्थापनांनी 31 मार्चअखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) 30 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी कळविले आहे.
    सेवा योजन कार्यालये(रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे) अधिनियम 1959 कलम 5 (1) (2) आणि नियमावली 1960 नियम क्रमांक 6 अन्वये अशी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावरही विवरणपत्र ऑनलाईन पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. विवरणपत्र न पाठविणा-या आस्थापनाविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असून अशा आस्थापनाची नावे विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याचे सहायक संचालक यांनी कळविले आहे.               
 
Top