तुळजापूर :- राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी विविध गावांना भेटी देवून तेथील जनतेच्या विकासाठी शासनाने राबविलेल्या विविध योजनेची माहिती दिली व जनतेशी त्यांनी संवाद साधून गावकरी व शेतकऱ्यांची अडी-अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या  विकास कामासाठी निधीची  कमरता कमी पडु दिली जाणार नसल्याचे श्री. चव्हाण यांनी यावेळी  सांगितले.
    त्यांच्यासमवेत अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं. स. उपसभापती प्रकाश चव्हाण, सहा. गटविकास अधिकारी श्री. चकोर, नायब तहसीलदार वाघे,जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ बंडगर,पं.स.सदस्यतुळजापूर श्री.दळवे,  अधिकारी, पदाधिकारी आदि उपस्थित होते.
     तुळजापूर तालुक्यातील मौ. खानापूर येथे दलित वस्तीत बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिराचे भूमीपूजन, दिंडेगाव येथे  सिमेंट रस्त्याचे उदघाटन, काळैगाव येथे बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. टेलरनगर येथे शेतकऱ्यांशी पिकाबाबत चर्चा केली. विंधन विहीरी, घरकुल, शेततळी, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी आवास योजना  आदिबाबत गावकऱ्याशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी  गावचे सरपंच, उपसरपंच आदि  उपस्थित होते.         
 
Top