Friday, 27 February 2015

मराठी दिनानिमित्‍त मनसेतर्फे मराठी शिक्षकांचा सत्‍कार

उस्‍मानाबाद - 27 फेब्रुवारी हा वि.वा. शिरवाडकर यांची जयंती मराठी भाषा दिवस म्‍हणून राज्‍यभर साजरा करण्‍यात येते. याचाच भाग म्‍हणून मनसेतर्फे मराठी विषय शिकवणारे शिक्षकांचा सत्‍कार करण्‍यात आला. 
   उस्‍मानाबाद प्रशालेत मराठी विषय शिकवणारे शिक्षक कुदळे बी.व्‍ही, बोचरे ए.व्‍ही, रणदिवे एन.एल यांचा सत्‍कार मनसेचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष दिनेश देशमुख, जिल्‍हा संघटक मिलींद चांडगे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्‍यापक मोहन सुरवसे यांच्‍यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. 

Labels: