कॉ. गोविंद पानसरे यांच्या अठवणी
नळदुर्ग (शिवाजी नाईक) कॉ. गोविंद पानसरे यांच्याबद्दल त्यांचे महाविद्यालयीन वर्गमित्र तथा नळदुर्ग येथील बालाघाट महाविद्यालयाचे निवृत्त दिनकरराव काटकर, प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद काळुंके, मारूती बनसोडे, अपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार, यांनी सांगितलेल्या आठवणी.
अठराविश्व दारिद्रय पाठीवर घेवून मी व गोविंद पानसरे कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमधून पदवीधर झालो. पानसरे हे बी.ए.एल. एल. बी. केले. मी एम.एस.सी पर्यत शिक्षण घेतलो. 1952 साली गोविंद पानसरे अहमदनगर जिल्हयातील कोलार या गावातून कोल्हापूरात आले. व मी कागल तालुक्यातील मुरगुड येथून कोल्हापूरात आलो. आमच्यात दाट मैत्री जमली. व एकाच खोलीत राहत होतो. एके दिवशी गोविंद हे रात्री 10 वाजता बोर्डिंगच्या खोलीत कॉलेज करून इतर चरितार्थाचे कष्टाळू कामे करून परत आले त्यांना बोंर्डिंग मध्ये उशिर झाल्याने त्यांना जेवण मिळणार नाही. हे गृहीत धरूनच येताना सोबत चारआण्याची भेळ ते घवून आले. मला म्हणाले चलो पार्टनर भेल खायेंगे. मी म्हणालो पानसरे आम्ही थोडेतर जेवलो तुम्ही उपाशी असाल तर तुम्हीच खा. भेळेवर भूक भागवून पानसरे झोपले. थोडयाच वेळाने दारावर टकटक अवाज आला. मी दार उघडले. व्हरंडयातून दोन व्क्ती बोलले पानसरे आहेत का? मी म्हटले आहेत. ते झोपलेत. तर त्यांना उठवा, पानसरे उठले तसेच त्यांना बाहेर भेटले. मला काय माहित कोण यावेळी यमदुत येतील ?
मी आभ्यास करित बसला. पण पानसरे रात्रभर आले नाहीत. मला वाटलं पोटा पाण्यासाठी कष्ट करणारा गरिब पानसरे असेल तसेच काही काम. पण पानसरे दुस-या दिवशी खोलीवर आले. मी विचारलो काय कुठे हाती स्वारी, तर म्हणाला आम्हाला पोलिसांनी त्यांच्या गाडीने पन्हाळ गडावर सोडले, कारण कळले की,तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाईकर यांचे गावात (कोल्हापूरात) रात्री व्याख्यान होते. म्हणून ही चळवळी पोरं काहीतरी वळवळ करतील म्हणून त्यांना पन्हाळ गडावर हद्दपार केले होते. 58 वर्षापूर्वीची ही घटना 1956 सालाची. पण गोविंद पानसरेच्या विचाराचा वारसा म्हणून आज ही अठवण अभिमानाने सांगताना ऊर भरून येतो. नळदुर्ग येथील बालाघाट महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक दिनकरराव काटकर कॉ. गोविंद पानसरे यांचे वर्गमित्र (हल्ली मुक्काम कोल्हापूर)
कम्युनिष्ठाच्या तुफानातला एक लाल दिवा आज अचानक विझला, चळवळ ही मानसाला जिवंत ठेवते, नवी दिशा देते, अनेक नव्या वाटा चोखंदळायला लावते, तोच चळवळीचा आणि फुले शाहु आंबेडकर विचाराचा वादळवेल कार्यकर्त्यांचा वाटाड्या कॉ. गोविंद पानसरे हे आमच्यातून शरीराने निघून गेले आहेत. पण.... त्याचे धगधगते विचार आम्हाला नेहमी उब देणारे आमच्या सोबत आहेत, विचारांची लढाई ही नेहमी विचारानेच करावी हा कानमंत्र देऊन उभ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचे काम कॉंम्रेंडनी केले आहे, ते म्हणाले होते की महाराष्ट्र पुरोगामी आहे हे विधान चुकीचे आहे. अखेर तेच घडलं आणि पुरोगामी महाराष्ट्रातील अनमोल तारा निखळला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लोभो हाच शेवटचा त्यांना माझा लाल सलाम - कॉं दयानंद काळुंके, सचिव आधार सामाजिक संस्था अणदूर ता. तुळजापूर
कॉं. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे मानवतेवर व पुरोगाहमत्वावर हल्ला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर जसे शेवटच्या क्षणापर्यंत अंधश्रध्दा निर्मुलनासाठी लढले त्याचप्रमाणे गोविंद पानसरे हे कामगार, कष्टकरी, मोलकरीण महिला यांच्या समस्यासाठी लढले. त्यांच्या प्रयत्नामुळेच मोलकरणीचा कायदा महाराष्ट्र शासनाने केला. आयुष्यभर त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला. व्यापक परिवर्तनाच्या लढयातील ते आग्रणी सेनानी होते. थोर समाजसेवक फले,शाहु, आंबेडकर यांच्या विचारधारा ते अधुनिक पध्दतीने समाजासमोर मांडत राहिले. शिवाजी कोण होता या पुस्तकाची चर्चा संपूर्ण राज्यात गाजली होती. दाभोळकर बरोबर मी काम करित असताना पानसरे यांची व माझी चारवेळा भेट झाली. व त्यांच्याकडून मला मेलिक मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली. पुर्वगामी कार्यकर्त्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरने व त्यांचे काम पुढे घवून जाणे हीच त्यांना खरी अदरांजली ठरणार आहे. सामाजिक कार्यकर्ते मारूती बनसोडे (सचिव - परिवर्तन सामाजिक संस्था, नळदुर्ग)
कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या म्हणजे लोकशाहीचे खुण असे मी समजतो. लोकशाही जिवंत ठेवून समाजहित जोपासायचे असेल तर कॉ. पानसरे यांच्यासारखे नेते, कार्यकर्ते जगले पाहिजे. त्यांना शासनाने संरक्षण दिले पाहिजे. डॉ. सुहास पेशवे (प्राचार्य, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग)
कॉ. गोविंद पानसरे यांचा नळदुर्ग येथील ''आपलं घरं'' प्रकल्पासी त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांनी अनेक वेळा अपलं घरंला भेट देवून ते अनाथ विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून त्यांच्यात रममाण होत असे. राष्ट्रसेवादलाचे जेष्ठ कार्यकर्ते सदानंद वर्दे, पन्नालाल सुराणा, बापू काळदाते यांच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्री असल्याने राष्ट्रसेवादलाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे. ते अनेक चळवळीमध्ये सुध्दा सहभागी व्हायचे. जेष्ठ विचारवंत अ.हा. साळुंके यांच्याबरोबर वर्षभरापूर्वी कॉ. गोविंद पानसरे यांनी ''आपलं घरंला' भेट देवून विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करून सर्वांशी मनमोकळी चर्चा केली. दि. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता '' आपलं घरं'' येथे जेष्ठ कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांच्या प्रमुख उपस्थितीत ''आपलं घर'' प्रकल्प येथे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक शिवाजी पोतदार यांनी सांगितले.
Labels: Khas

<< Home