शिवजयंती निमित्त घाणेगावकरांनी घेतला हागणदारीमुक्तीचा ध्यास
वैराग (वैराग) २0१0-११ साली स्थापन झालेल्या मातृभूमी प्रतिष्ठानने सुरूवातीपासूनच विकासाचा ध्यास घेऊन गावाच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान, प्रवेशद्वार, बसथांबा शेड, शेतकरी भवन, वृक्ष लागवड, पाणी अडवा, पाणी जिरवा, शेतकरी, महिला, पुरूष बचत गट, विधवा, निराधारांना आर्थिक मदत, कृषी प्रदर्शनासाठी शेतकर्यांच्या सहली, सांस्कृतिक चळवळ, घाणेगाव फेस्टिव्हल, आर्थिक दुर्बल घटक व गरीब मुला-मुलींना दत्तक घेऊन शैक्षणिक खर्च उचलणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले आ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून घाणेगाव (ता. बाश्री) येथील मातृभूमी प्रतिष्ठानने सामाजिक, शैक्षणिक कार्यातून गावाच्या विकासाला सुरूवात केली असून, शिवजयंतीनिमित्त पुरूष व महिलांसाठी शंभर शौचालयांच्या बांधकामाचा शुभारंभ लोकसहभाग व श्रमदानातून गुरूवारी करण्यात आला. शासनाच्या मदतीविना हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.
घाणेगावची लोकसंख्या ३४00 इतकी असून, १८00 पुरूष व १६00 महिला आहेत. गावात ५५0 कुटुंबे असून, साडेतीनशे कुटुंबांकडे शौचालये नाहीत. यामुळे मातृभूमी प्रतिष्ठानने या शौचालय बांधकामाला प्राधान्य दिले आहे. ज्यांच्याकडे शौचालयासाठी स्वत:ची जागा नाही, आर्थिक परिस्थिती नाही, अशा गरीब कुटुंबांसाठी प्राधान्य दिले आहे. लाभार्थी कुटुंबांसाठी गावाच्या चारही बाजूला पुरूष व महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शंभर शौचालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थी कुटुंबांची माणसी दहा-वीस, नोकरदार वर्गातील प्रत्येक कुटुंबाने एक सिमेंट पोती, ट्रॅक्टर घेण्यात येणार असून, बैलगाडी मालकांनी वाळू, दगड, मुरूम वाहतूक अशी कामे करणार आहेत.
शौचालयाच्या निर्मितीनंतर त्याच्या देखभालीसाठी प्रतिष्ठानतर्फे पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून, देखभालीसाठी गावातील विधवा, अपंग अशा पुरूष व महिलांची नेमणूक त्यांच्या निवासासह करण्यात येणार आहे. याच्या खर्चासाठी प्रत्येक कुटुंबामागे दररोज एक रूपया याप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. जमा होणार्या पैशांतून हा खर्च भागविण्यात येणार आहे. यासाठी शासनाची कोणतीही मदत घेतली जाणा नाही. यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर चवरे, सतीश जाधव, दयानंद गोसावी, महेश पवार, काका दाभाडे, हरिभाऊ शिंदे, लक्ष्मण महाराज मोरे, अर्जुन राऊत, संपत बचुटे, काळू नेरके, सौदागर नाईकवाडी, पोपट जाधव, धनाजी नेरके, आण्णा बचुटे, बाबा मोरे, भीमा नेरके यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. सुट्टीच्या दिवसाचा पगार विकासाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर चवरे यांनी सुट्टीच्या दिवसाचा पगार गावाच्या विकासावर करून गाव विकासाचा ध्यास घेतला आहे. या विकासकामांमध्ये युवक, ग्रामस्थ, नोकरदारांना सामावून घेऊन गावाचा कायापालट करण्यासाठी धडपड सुरू केली असून, याला चांगला प्रतिसादही लाभत आहे. यामुळे त्यांना कोल्हापूर येथील आविष्कार सोशल एज्युकेशन फाउंडेशनने ज्ञानज्योती पुरस्कार तर ग्रामस्थांनी क्रांतिगुरू ही पदवी दिली आहे.
Labels: Barshi

<< Home