उस्मानाबादेत बेरोजगारांसाठी मेळावा
उस्मानाबाद - जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद आयोजित पुणे, औरंगाबाद,बारामती येथील खाजगी क्षेत्रातील नामकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांचेकडील विविध पदे भरण्यसाठी मंगळवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10-30 वा. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उस्मानाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पुरुष व महिला उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश पवार सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील पुरुष व महिला बेरोजगार उमेदवारांसाठी 4 उद्योजक 405 पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून निवड प्रक्रिया करणार आहेत.
डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंटफिनीशींग स्कुल, एरंडवणे पुणे अंतर्गत- पीएमटी मशीनस लि. पिंपरी पुणे, जॉबट्रेनी या पदासाठी उमेदवार आय टी आय कोणताही ट्रेड पास असावा, विप्रो इंटरप्रायइरजेस लि. वाळूज, औरंगाबाद, ट्रेनीची एकुण 200 पदासाठी 18 ते 26 या वयोगटातील आय. टी. आय. मॅकानीक असावा. टलब्रोस लि. भोसरी, पुणे,आय टी आय फीटर , मेकॅनीकल व रेहू पॉलीमर इंडस्ट्रीजलि राजगुरुनगर,जि.पुणे जॉब ट्रेनी या पदासाठी दहावी पासकिंवा आय टी आय कोणताही ट्रेड पास असावा, वरील कंपनीसाठी 200 जॉब ट्रेनीची पदे भराण्यात येणार आहेत.
एमपीपटीए एज्युकेशनलि पुणेअंतर्गत- पियाजी व्हेईकल्स प्रा.लि. बारामती , जॉब ट्रेनीसाठी महिला व पुरुषाची पदे आय टी आय ट्रेड पास असावा, व्हेस्पा लि. बारामती जॉब ट्रोनी या पदासाठी आय टी आय कोणताहाही ट्रेड पास, मे. अलीकॉन प्रा ली सणसवाडी पुणे व टेस्टी बाईट ली यवत, पुणे या कंपनीत जॉब ट्रेनी येथे जॉब ट्रेनी या पदासाठी दहावी किवा बारावी पास असावा, पुरुष किंवा महिला उमेदवारांतून जॉब ट्रेनीची 205 या पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रीया करतील.
वरील पदासाठी वेतन /विद्यावेतन सर्वसाधारणपणे 7 हजार ते 9 हजाराच्या दरम्यान असून कॅन्टीन ,निवास, ट्रान्सपोर्टेशन आदि सोयी, सुविधा संबंधित कंपनीच्या नियमानुसार प्रत्यक्ष मुलाखतीचे वेळी कंपनीचे अधिकारी माहिती देतील. वरील पदासाठी पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारानी त्यांचे शैक्षणीक पात्रता, वय, अनुभव आदि मुळ प्रमाणपत्र ॲटेस्टेड छायाप्रती व जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड ,पासपोर्ट आकाराचे फोटो ,स्वत:चा बायोडाटा आदि कागदपत्रांसह प्रतयक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02472-222236 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Labels: Osmanabad

<< Home