पांगरी (गणेश गोडसे) जिद्द,चिकाटी,मेहनत व कांहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी मनात असल्यास कोणतीच गोष्ट अशक्य ठरू शकत नसल्याचा प्रत्यय वाणेवाडी ता.बार्शी येथील उपक्रमशील शेतकर्यांने ''सिताफळाच्या'' माध्यमातून दाखवला आहे. वाणेवाडी येथील प्रयोगशील शेतकरी अनंता महादेव गरदडे यांनी हनुमान व गोल्डन हे नवीन वान विकसित करून अल्प पाण्यावर एकरी चा
निसर्गाची अवकृपा,सततचा पाचवीला पूजलेला दुष्काळ,शासनाचे कुचकामी धोरण यासह शेती परवडत नाही,शेतकरी संकटात आहे अशी ओरड करणार्याना विचार करायला लावणारा हा उच्च उत्पन्न मिळवलेला शेतकरी आज आयडोल ठरू पहात आहे.हलक्या प्रतीच्या,मुरमाड जमिनीवर अल्प पाण्याचा विचार करून ठिबक सिंचनच्या आधारे सिताफळाची बाग फुलवली आहे.बार्शी तालुका हा तसा अत्यल्प पर्जन्यमानाचा व दुष्काळी तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे.मात्र त्यामुळे खचून न जाता बार्शी तालुक्यातील शेतकर्यांणी आहे त्या परिस्थिसीस तोंड देत उपलब्ध पाण्याचा वापर करत हरित क्रांती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मनात जिद्द केल्यास कांहीही घडू शकते.अनंता गरदडे या शेतकर्याने आपल्याकडे असलेलेया अल्पश्या पाण्याचा व ठिबक सिंचनचा वापर करून प्रथम सिताफळाची 'बाळानगरी' जातीची रोपे आणून प्रयोग केला.या बाळांनागरि जातीच्या सीताफलांना पेनशीलच्या आकाराच्या फांद्या आल्यानंतर त्यामध्ये 'पाचर'पद्धतीने कलम करून 'गोल्डन'आणि 'हनुमान'जातीचे दोन सिताफळाचे वान विकसित केले.गोल्डन जातीच्या सिताफळांना लहान पण चविष्ट फळे येतात.हनुमान जातीच्या सिताफळाच्या वाणांना मोठ्या आकाराची फळे लागतात.पंधरा फुटाच्या अंतरावर रोपाची लागवड केली जाते.दोन झाडांच्या मध्ये शेवगा,घेवडा,सोयाबीन,मेथी,कोथिंबीर आदि विविध अंतरपिके घेता येतात.सीताफळास जनावरे खात नसल्यामुळे व रोगराई होत नसल्यामुळे कोणतीच भिती रहात नाही.या वाणांची लागवड केल्यानंतर साधारणत: तिसर्या वर्षी सीताफळे येण्यास सुरुवात होते.सीताफळांना रासायनिक खांची गरज नसल्यामुळे फळांची टिकवन क्षमता जास्त रहाते.फळे लागण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी यात आंतरपिक घेता येते.त्यामेळे फाळे सुरू होण्यापूर्वी शेतातून इतर उत्पन्न घेता येते.याचा सीताफळांच्या झाडांवर कांहीही परिणाम होत नाही.
चौकट: शासन फळबागा लागवडीसाठी अनुकूल असून त्यासाठी अनुदानाही देते.हेक्टरी 32 हजार रुपये सरकारी अनुदान देण्यात येत असून सध्या ही अनुदानाची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषि सहाय्यक गणेश पाटील यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.