लिटील स्टार शाळेत शिवजयंती साजरी - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, 19 February 2015

लिटील स्टार शाळेत शिवजयंती साजरी

उस्‍मानाबाद - पोलिस कल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील लिटील स्टार शाळेत आज शिवजयंती निमित्त विद्याथ्र्यांसाठी निबंध, रांगोळी व शिवकालीन वेशभुषा स्पर्धा घेण्यात आल्या.
        येथील लिटील स्टार प्रास्थमिक शाळेत आज छत्रपती शिवा
जी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक दिपक भांगे यांच्या हस्ते छत्रपतीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यानंतर शाळेतील इयत्ता ४ ते ८ वीच्या विद्याथ्र्यांसाठी, शिवाजी महाराजांचे संघटन कौशल्य, शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य व शिवाजी महाराजांचे बालपण या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तर इयत्ता ३ री च्या वर्गातील विद्याथ्र्यांसाठी मुक्तहस्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच निंबध स्पर्धेनंतर ४ ते ८ वीच्या विद्याथ्र्यासाठी शिवकालीन वेशभुषा ही स्पर्धा घेण्यात आली. वरील सर्व स्पर्धेत शाळेतील सर्व विद्याथ्र्यांनी उत्साहात भाग घेतला होता. शिवजयंती निमित्त आयोजित हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिपक भांगे यांच्यासह लोमटे सर, कोकणे सर, शेटे सर, पाटील सर यांच्यासह श्रीमती झोरी, श्रीमती कांबळे, श्रीमती चौधरी, श्रीमती घोडके, श्रीमती गोरे, श्रीमती पांचाळ, श्रीमती शिवणीकर, श्रीमती रेणुका पाटील, श्रीमती रेगुडे व श्रीमती डोके आदिंनी मोलाचे परिश्रम घेतले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages