Saturday, 28 February 2015

काठीने मारहाण प्रकरणी पाच जणावर गुन्‍हा दाखल

पांगरी - घराकडे बघण्याच्या किरकोळ कारणावरून पाच जणांनी मिळून घरात घुसून दोघांना काठीने मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना काल दि.27 शुक्रवारी 8.30 वाजता खडकोणी ता.बार्शी येथील वस्तीत घडली.अलका अनिल बगाडे,व विपुल अनिल बगाडे दोघेही रा.खडकोणी अशी मारहाणीत जखमी झालेल्याची नांवे असून पांडुरंग उत्रेश्वर शिंदे,अर्जुन बलभीम शिंदे,उत्रेश्वर शिंदे,सरस्वती उत्रेश्वर शिंदे,व मनीषा पांडुरंग शिंदे (सर्व रा.खडकोणी)अशी जातिवाचक शिविगाळ  केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नांवे असून त्यांना शनिवारी(28) ताब्यात घेण्यात आले आहे.
  जखमी अलका बगाडे या महिलेने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे घर आरोपीच्या घरासमोर आहे.आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात घुसून त्यांचा मुलगा विपुल यास तू आमच्या घराकडे का बघतोस,तुमची लायकी आहे काय असे म्हणत जातवाचक शिवीगाळ केली.काठीने मायलेकरांच्या डोक्यात,पायावर मारून लाथाबुक्यांनी मारहाण करत तुम्हाला ठेवत नाही,पुन्हा बघतो असे म्हणून दमबाजी केली.
  पांगरी पोलिसात अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमानव्ये पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सर्जेराव ठोंबरे हे करत आहेत.

Labels: