जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचा ९८ टक्के निकाल
जळकोट, दि. २९ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचा निकाल ९८ टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह २२, प्रथम श्रेणीत १६ द्वितीय श्रेणी ४, तृतीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .शाळेची विद्यार्थिनी कु. श्वेता बबनराव मोरे ही ९३.६० टक्के गुण घेऊन जळकोट केंद्रात प्रथम आली आहे. कु. अनुराधा धनाजी जाधव ही ९२.७ टक्के गुण घेऊन केंद्रात द्वितीय आली आहे तर कु. ज्योती खंडू चंदे ही ९२% घेऊन केंद्रात तृतीय आली आहे . तसेच मूलांमधून आकाश संजयकुमार सगर प्रथम ८४.८०, किरण बिराजदार द्वितीय ८१.६०, घनश्याम कदम तृतीय ८१.२० आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बंकटराव कदम, संस्थेचे सचिव महेश कदम , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी- कदम , विजयकुमार मोरे ,अभिमन्यू कदम , बसवराज मडोळे ,पंढरीनाथ कदम , सुजाता होटकर , सचिन गुड , तळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Labels: Naldurg




<< Home