"हॅलो" फाऊंडेशनला जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांची भेट
अणदूर : हॅलो मेडिकल फौंडेशन संस्थेला दिनांक २७ ऑगस्ट रोजी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एच. व्ही. वडगावे हे ही उपस्थित होते. जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच हॅलो संस्थेत आल्याने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी हॅलो संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भावाची सदस्थिती बद्दल माहिती जाणून घेत असताना कार्यकर्त्यांकडून ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीला ज्या गांभिर्याने लोक सतर्क होते त्या तुलनेत आता सद्य परिस्थितीत निष्काळजीपणाने वागत असल्याचे चिंताजनक स्थिती समोर आली. मास्कचा वापर , हाथ वारंवार धुणे आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवणे या क्रिया मागे पडल्या आहेत . या पार्श्वभूमीवर आशा कार्यकर्त्या व स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते जनजागृतीचे काम नेटाने करून लोकांना न घाबवरता परिस्थिती चे गांभिर्य समजावून सांगणे गरजेचे आहे. कुठल्याही परिस्थितीत हार न मानता कोरोना ला हरवण्यासाठी कोरोना योध्दा नी पुढाकार घेतला पाहिजे याविषयी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आशा कार्यकर्तीच्या कोरोना विषयक काम करताना येत असलेल्या अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या सर्व आशाना थर्मल स्कॅन , ऑक्सिमिटर यासह आवश्यक त्या औषध गोळ्यांचा किट ही पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी हॅलो संस्थेने जिल्ह्यातील ७० गावातून कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर जनजागृती सह गरजू साठी राबविलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती जाणून घेत कोरोना पार्श्वभूमीवर हॅलो संस्थेने केलेले काम कौतुकास्पद असून पुढील काळात आपत्तीग्रस्त परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, शासकीय यंत्रणा यांना सोबत घेऊन जिल्हा कोरोना मुक्त करणार असल्याचे श्री दिवेगावकर म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी दिवेगावकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ वडगावे यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करून कोरोना योद्धा ना आरोग्य किटसह मास्क, सॅनिटायझर चे वाटप ही करण्यात आले
याप्रसंगी जानकी रुग्णालयाच्या मु.वैदयकीय अधिकारी डॉ शुभांगी अहंकारी यांच्यासह आशा कार्यकर्त्या व हॅलो संस्थेच्या प्रेरक, प्रेरीका व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत अहंकारी तर आभार डॉ. शुभांगी अहंकारी यांनी मानले.
Labels: Naldurg


<< Home