उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखुमुक्त करण्याचा निर्धार - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, 27 August 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखुमुक्त करण्याचा निर्धार

 


अचलेर : जय गायकवाड

कोव्हिड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता,पोषक आहार, तणाव निर्मूलन आणि तंबाखूमुक्ती ह्या विषयांवर ऑनलाईन जिल्हास्तरीय प्रशिक्षण शालेय शिक्षण विभाग,आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लखनगाव आयोजित दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते जि .प उस्मानाबाद यांच्या परवानगीने झूम मिटिंगच्या साह्याने तंबाखूमुक्त शाळा करणे या विषयावर वेबिनार संपन्न झाले. 

यावेळी कार्यक्रमात प्राथमिक शिक्षणाधिकारी रामलिंग काळे, शिक्षणाधिकारी प्राथ व माध्य जिल्हा उस्मानाबाद यांनी ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उस्मानाबाद जिल्हातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हातील सर्व केद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांना आवाहान केले.यासाठी आपल्या शाळेचे सर्व माहिती तंबाखू मुक्तअँप वर अपलोड करावे. आपली शाळा व परीसर तंबाखूमुक्त करावे.याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व जिल्हातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करणार असे मत मांडले.तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचे प्रतिनिधी आरोग्य अधिकारी डॉ. उस्मान राठोड यांनी ऐलो लाईन *अभियान बद्दल माहिती दिली.यावेळी वेबिनार मध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी रामलिंग काळे, उपशिक्षणाधिकारी उध्दव सांगळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभागचे प्रतिनिधी डॉ.उस्मान राठोड,जिल्हातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, जिल्हास्तरीय तज्ञ मार्गदर्शक शिक्षक, तालुका निहाय प्रत्येकी ५ तंत्रसहाय्य शिक्षक उपस्थीत होते.

          सलाम मुंबई फाऊंडेशन चे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदेश देवरूखकर यानी अधिकारी वर्ग व पदाधिकारी तसेच शिक्षक वृन्द यांना पी.पी.टी. सादरीकरण द्वारे तंबाखू मुक्त शाळा व कोविड मुक्त आरोग्यदायी जीवन तसेच तंबाखु मुक्त शाळे चे 11 निकष व Tobacco Free School  App विषयी अद्यवत माहीती देवून मार्गदर्शन केले.तसेच श्री.स्वामी समर्थ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था औसा, लखनगावचे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक राहुल खरात ह्यानी शिक्षकांना झूम द्वारे जोडण्यासाठी परिश्रम घेतले.

    यावेळी उमरगा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, केंद्रप्रमुख शिला मुदगडे, सुभाष चव्हाण, नंदकुमार चौधरी, तज्ञमार्गदर्शक उमेश खोसे, लक्ष्मीकांत पटणे, बळीराम घोरवाडे तसेच इतर अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages