बोस्‍टन - इंटरनेट एक्‍सप्‍लोरर म्‍हणजेच ‘आयई’ वर आतापर्यंतच्‍या सर्वात खतरनाक व्‍हायरस सापडला असल्‍यामुळे मायक्रोसॉफ्टने आयई वापरणा-या जगभरातील ग्राहकांना हे ब्राऊसर वापरणे धोकादायक असल्‍याचा इशारा दिला आहे. इंटरनेट एक्‍सप्‍लोररमध्‍ये एक धोकादायक बग (व्‍हायरस) सापडला आहे. त्‍यामुळे ब्राउसर वापरणा-या संगणकातील व्‍यक्‍तीगत डाटा नष्‍ट होण्‍याची भीती व्‍यक्‍त केली आहे. पायसन वेली असे नाव व्‍हायसरला देण्‍यात आले आहे. हा व्‍हायरस इतका धोकादायक आहे की तो तुमच्‍या संगणकात घुसल्‍यास संगणक थेट हॅकर्सच्‍या रिमोट कंट्रोलशी जोडला जातो. त्‍यामुळे तुमच्‍या इंटरनेट वापराची क्षणाक्षणाची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. तुमच्‍या संगणकावरून होणा-या प्रत्‍येक क्लिकवर नजर ठेवू शकतात, अशी माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. जगभरातील नेटीझन्‍सपैकी 33 टक्‍के लोक इंटरनेट एक्‍सप्‍लोर वापरतात. त्‍यामुळे मायक्रोसॉफ्टने या संभाव्‍य धोक्‍याची गंभीर दखल घेतली आहे. * सौजन्‍य - मुंबई चौफेर
 
Top